Happy Guru Purnima Wishes In Marathi, Shayari, SMS Whatsapp Status in Marathi Language 2019. इस लेख में हम आपको दे रहे है गुरु पूर्णिमा के लिए विशेष मराठी शुभेच्छा मेसेज, शायरी और कोट्स. social media में से सेलेक्ट करके सबसे best, Latest गुरु पूर्णिमा मराठी शायरी और status का कलेक्शन किया है. आप यहाँ से सभी status और Quotes को facebook और whatsapp, twitter पर शेर कर सकते है.
आपको यहाँ से गुरु पूर्णिमा मराठी माहिती, कविता, भाषण, शायरी और status मिल जायेंगे. guru purnima marathi madhe, importance of guru in marathi, speech on guru in marathi और guru purnima marathi picture, गुरूपौर्णिमा मराठी माहिती 2019 भी मिल जायेंगे.
गुरु पूर्णिमा मराठी माहिती
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.
गुरु पूर्णिमा मराठी शुभेच्छा
guru purnima chya hardik shubhechha in marathi
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Click to Share
“आज गुरुपौर्णिमा” ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा, माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा.. मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…! गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Click to Share
श्री स्वामी समर्थ गुरूंनी आपल्याला जो बोध केला आहे. जी शिकवण दिली आहे. ती प्रत्यक्ष कृतीत उतरवणे, आखून “कोहम् ( मी कोण? याचा स्वत:त सर्व पातळ्यांवर शोध घेत) दाखवलेल्या मार्गाचा सतत अभ्यास व अवलंब करत “सोहम्” स्थितीपर्यंत पोचणे. आयुष्यात गुरूचा शब्द निष्ठेने आणि श्रद्धेने चालवण म्हणजे खर #गुरूपूजन.
Click to Share
Guru Purnima Marathi Wishes
“आज गुरुपौर्णिमा” माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच, माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत… आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले, सर्वांचे धन्यवाद! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा… जय गुरुदेव दत्त!
जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला, रागावली तरी त्याला सोडू नका. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
Click to Share
गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा…
Click to Share
ज्यांनी मला घडवलं या जगात लढायला,जगायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Click to Share
ज्ञान व्यवहार विवेक आत्मविश्वास देणार्या जगातील प्रत्येक गुरूला वंदन! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Click to Share
Happy Guru purnima marathi quotes
सर तुमची कमी मला आज भासत आहे कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे तुमच्यासमोर मी नतमस्तक झालो आहे मला आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
Click to Share
आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे||१|| गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप||२|| गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||३|| तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||
Click to Share
|| गुरुपौर्णिमा || आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला अनेक लहान थोर व्यक्ती भेटल्या त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळाल्या… ● माणुस हा आजन्म विद्यार्थी असतो म्हणुनच ज्यांनी ज्यांनी माझ्या जीवनाला आकार दिला त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ● सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….
Click to Share
Guru Purnima Marathi Whatsapp Status
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर: गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Click to Share
गुरूविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट – गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
अहंकारामुळे व्यक्ती स्वतःला देवापासून वेगळी समजते आणि जीवनात सतत दुःखी रहाते. तेव्हा आपल्या जीवनात जर आध्यात्मिक गुरु यायला हवेत, तर आपण आपल्या जीवनाला प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप यांची जोड द्यायला हवी.
Click to Share
गुरू हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. तो लहान किंवा मोठा असतो. आपल्या आजुबाजूच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. म्हणून यंदाच्या गुरू पौर्णिमेदिवशी त्या सार्यांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करा आणि आगामी वर्षभरात अजून नव्या गोष्टी शिकण्यासाठी सज्ज व्हा!
Click to Share
Importance of guru in marathi
गुरु चे महत्व मराठी
भारताचे कमीतकमी शब्दांत सांगता येईल असे वैशिष्ट्य म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ होय ! गुरूंशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर अशी अनेक वैशिष्ट्ये गुरूंबद्दल सांगता येतील. गुरु म्हणजे काय, गुरुंचे जीवनातील महत्त्व, गुरुकृपा कार्य कशी करते यांबाबतचे विवेचन या लेखातून समजून घेऊया.
१. गुरु या शब्दाची व्युत्पत्ति, व्याख्या आणि अर्थअ. व्युत्पत्ति गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः । अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते ।।
अर्थ : ‘गु’कार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि ‘रु’कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज; म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालविणारा.
आ. व्याख्या आणि अर्थ गुरु शब्दाच्या काही व्याख्या आणि अर्थ पुढीलप्रमाणे आहेत.
१. शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नति व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूति देतात, त्यांना गुरु असे म्हणतात. गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते (कारण ते प्रारब्धानुसार असते), तर केवळ आध्यात्मिक उन्नतीकडेच असते.
२. ‘ईश्वर आणि भक्त वेगळे असत नाहीत; पण ईश्वर निर्गुण असल्यामुळे त्याला देहभाव असलेल्या भक्ताशी बोलता येत नाही; म्हणून तो आपल्या कार्यब्रह्माशी भक्ताची गाठ घालून देतो. त्या कार्यब्रह्मालाच गुरु असे म्हणतात; म्हणजेच गुरूंच्या रूपाने तोच बोलत असतो.’